शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात भोसे येथे अंत्यसंस्काऱ

0 झुंजार झेप न्युज

शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात भोसे येथे अंत्यसंस्काऱ

सातारा,दि.6: शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर आज भोसे ता. कोरेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे,आमदार महेश शिंदे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी शहीद जवान विपुल इंगले यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.शहीद विपुल इंगले यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.