शिंदे सरकार स्थापन झाल्याबद्दल सिन्नर प्रहार पक्ष,माजी शिवसैनिक व मराठा मोर्चाच्या वतीने लाडू वाटप करत आनंद साजरा.
सिन्नर : शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व आनंदजी दिघेंचे विचार घेऊन सिन्नर तालुक्यात अडचणीच्या काळात आमदार कोकाटे शिवसेना सोडुन गेले तेंव्हा व २००९ला प्रकाशजी वाजे शिवसेना तिकीटावर पराभुत झाल्यावर वाजे बरोबर राजाभाऊ वाजे,उदय सांगळे सह सारे राष्ट्रवादी पक्षात निघून गेले. तेंव्हाच्या अडचणीच्या काळात शिवसेना उभी करणारे तत्कालीन तालुकाप्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील व कट्टर शिवसैनिक यांनी कष्टाने २००९ते२०१४दरम्यान शिवसेना उभी केली.परंतु खासदारकीला सुगीचे दिवस आले आणि राष्ट्रवादीत गेलेले वाजे गट पुन्हा विधानसभेसाठी पक्षात आले.आणि अडचणीत घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना उभी करणारे,१३०गावात शाखा खोलणारे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा सिन्नर येथे दशक्रिया विधी करणारे तत्कालीन तालुकाप्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील व कट्टर शिवसैनिक यांना एकेकाला बाहेरचा रस्ता दाखवला.आज पक्षात एकही ओरिजनल शिवसैनिक नाही.ते सर्व जुने शिवसैनिक माजी शिवसेना तालुकाप्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समदुःखी लढवय्ये योद्धा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या भेटीसाठी जाणार आहेत.मुखमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना साथ देणार आहेत.आदरणीय बच्चुभाऊ कडु यांनी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना साथ दिली आहेत.
आज ह्या सैनिकांनी माजी शिवसेना सिन्नर तालुकाप्रमुख व आजी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद तुकाराम शिंदे पाटील व सहकारी,माजी शिवसैनिक,प्रहार सेवक,मराठा मोर्चाचे कार्यकर्ते यांनी आपल्यातील सैनिक एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या बद्दल सिन्नर शहरात लाडु वाटुन आनंद साजरा केला.
५०आमदार व आदरणिय बच्चु भाऊ कडू ,प्रहार, भाजप,अपक्ष यांच्या साथीने एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस उपुख्यमंत्रीपदी विराजमान झल्या बद्दल.शिवसेना पक्षासाठी जिवाची, कुटुंब यांची पर्वा न कष्टाने शिवसेना महाराष्ट्रात उभी करणारे एकनाथजी शिंदे सरकार स्थापन झाल्या बद्दल , मुख्यमंत्री झाल्या बद्दल सिन्नर प्रहार तालुका अध्यक्ष ,माजी शिवसेना तालुकाप्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर प्रहार पक्ष व मराठा क्रांती मोर्चा,माजी शिवसैनिक यांच्या वतीने सिन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय...
शिंदे साहेब आगे बढो ....
बच्चूभाऊ कडू आगे बढो....
हम आपके साथ है
प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो....
अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
सिन्नर तालुक्यातील नागरिकांना पेठेत लाडू वाटप करण्यात आले.सिन्नरचे नागरिक शेतकरी, गोरगरीबांची काळजी करणारा आपल्यातला मुख्यमंत्री झाल्या बद्दल समाधान व्यक्त करत होते.
यावेळी प्रहार तालुका अध्यक्ष शरद तुकाराम शिंदे पाटील, शिवाजी भाऊ गुंजाळ संघटक,, सुनील महाराज जगताप उपाध्यक्ष,, गोपाळ गायकर उपाध्यक्ष, सुरेश भाऊ सानप, संदीप लोंढे युवा अध्यक्ष,अमित शिंदे शहर अध्यक्ष, रमेश लाड भाजीपाला अध्यक्ष, निलेश चव्हाण, बापू सानप संघटक,अर्जुन घोरपडे, पंकज पेटारे गट अध्यक्ष, समाधान गावंडे यांनी आनंद साजरा केला.

