सिल्लोडमध्ये विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0 झुंजार झेप न्युज

 सिल्लोडमध्ये विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

औरंगाबाद,दि.31: सिल्लोडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिल्लोड शहराच्या दौर्‍यावर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, स्व.बाळासाहेब ठाकरे चौक, नगर परिषद प्रशासकीय इमारत, नगर परिषद प्रशाला बांधकाम व भराडी येथील नॅशनल सूतगिरणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.