हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन

0 झुंजार झेप न्युज

 हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन.

बुलडाणा, दि. 9: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिजामाता प्रेक्षागार येथे सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आज पार पडला. राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. यात शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवित हजारो विद्यार्थ्यांनी सामुदायिक राष्ट्रगीत गायन केले.

सामुदायिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. आज सकाळी 11 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिस बॅण्डसह हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहात एक ताल, एका सुरात राष्ट्रगीत गायन केले.

हातात तिरंगा घेतलेले विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सामिल झाले. प्रेक्षागार येथे येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फी पाईंट उभारण्यात आला. याठिकाणी अनेकांनी सेल्फी काढले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.