उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक पदाधिकारी मंत्रालय मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

0 झुंजार झेप न्युज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक पदाधिकारी मंत्रालय मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहरातील मा.नगरसेवक व पदाधिकारी यांनी मंत्रालय मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची प्रथमच सत्ता आल्यानंतर शहरातील अनेक महत्वपूर्ण विकासकामे मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.शहराच्या विकासाला गती देणारे आणि चालना देणारे मोठमोठे प्रकल्प विकसित करण्यात आले. यापैकी लोकउपयोगी ५ महत्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात यावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. 

तसेच "उपमुख्यमंत्रीपदी" निवड झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे, निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभा श्री.शंकर जगताप, मा.उपमहापौर सौ. नानी घुले, मा.नगरसेविका सौ.संगीता भोंडवे, सौ. शारदा सोनावणे, सौ.मनीषा पवार, सौ.माधवी राजापुरे, सौ.आरती चोंधे, सौ.उषा मुंढे, सौ.निर्मला कुटे मा.नगरसेवक श्री बाबासाहेब त्रिभुवन, श्री.सुरेशजी भोईर, श्री.सागर अंघोळकर, श्री. राजेंद्र गावडे, श्री अंबरनाथ कांबळे श्री.विनायक गायकवाड, श्री.अभिषेक बारणे, श्री.नरेश आप्पा खुळे, श्री.कैलास कुटे, सामाजिक कार्यकर्ते श्री.तानाजी बारणे, आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.