श्री क्षेत्र चोंढाळा येथील ऐतिहासिक ' बारव ' ला ऑस्ट्रेलिया व इटली देशातील पर्यटकांची भेट

0 झुंजार झेप न्युज

श्री क्षेत्र चोंढाळा येथील ऐतिहासिक ' बारव ' ला ऑस्ट्रेलिया व इटली देशातील पर्यटकांची भेट

विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : जवळील श्री क्षेत्र चोंडाळा येथील दगडी बांधकाम केलेल्या पौराणिक व ऐतिहासिक बारवेला शुक्रवार रोजी ऑस्ट्रेलिया व इटली देशातील पर्यटकांनी भेट दिली.आज शुक्रवार रोजी ऑस्ट्रेलिया येथील व्यवसायाने शिक्षिका असलेल्या शेरी डेव्हीस मॅडम, व इटली येथील ,व्यवसायाने इंजिनियर असलेले एन्झो अरडेली सर , या पर्यटकांनी चोंडाळा येथील पौराणीक दगडी बांधकाम केलेल्या ऐतिहासिक बारवेला भेट दिली.

यावेळी झुंजार झेप न्यूज चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की अप्रतिम बांधकाम असलेली हि बारव आहे या बारवचे संवर्धन करून जतन करायला हवे तसेच यावेळी त्यांनी या पौरानीक बारवचे निरीक्षण केल्यानंतर बारवेच्या ठिकठिकाणी जागेवर काटेरी झुडूप व गवत आढळल्याने त्यांनी अशी खंत व्यक्त केली की या ऐतिहासिक ठेव्याची योग्य ती निगा राखून व संवर्धन करून जतन करायला हवे तसेच ही बारव पाण्याने काठोकाठ भरलेली असूनही कोणताही उपयोग या पाण्याचा होत नसल्यानेआश्चर्य व्यक्त केले तसेच तुमच्या पूर्वजानी खूप दूरदर्शी पणा पाहून व मेहनत घेऊन ही बारव बांधण्यात आल्याचे बांधकाम बघूनच समजते परंतु तुमच्या अलीकडच्या पिढीला साधी साफसफाई न करता येत असल्याने खंत व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत आलेले गाईड आकाश ढोमणे विहामांडवा येथील पत्रकार विक्रम थोटे, प्रशांत नरके ,पत्रकार शब्बीर शेख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, बाप्पा येळे,ओम जोडणार, अदी लोकांची उपस्थीती होती.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.