मा.सरपंच अफसरभाई यांच्या घरी पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

0 झुंजार झेप न्युज

मा.सरपंच अफसरभाई यांच्या घरी पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

विहामांडवा: पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री यांचा औरंगाबाद दौरा झाला, त्यांनी विहामांडवा येथे रेणुका देवी मार्टचे उद्घाटन करून ,मा.सरपंच तथा विद्यमान ग्रा.स.अफसरभाई (मास्टर )यांच्या घरी सदिच्छा भेट दिली,याबाबत सविस्तर माहिती अशी की पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा औरंगाबाद दौरा 26 सप्टेंबर 2022 रोजी झाला .यावेळी त्यांनी विहामांडवा येथे रेणुका देवी मार्ट दुकानाचे उद्घाटन केले, व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विहामांडव्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष जनतेच्या हृदयामध्ये ठसलेले मा. सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अफसर भाई शेख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. 

यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, पालकमंत्री पदाचा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन विहामांडवा परिसरातील गोरगरिबाच्या कामासहित विकास कामाला जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे मत साहेबांनी दैनिक लोकपात्राच्या प्रतिनिधीशी व्यक्त केले, यावेळी रेणुका देवी शरद कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायतचे उपसरपंच व युवा पिढीचे मार्गदर्शक मूकेशशेठ काला यांच्यासह गावातील सर्व समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

संदीपान भुमरे साहेबांना पालकमंत्री पद मिळाल्यामुळे विहामांडवासह परिसरातील विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार, आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाल्यामुळे निश्चितच याचा फायदा करून घेणार : मा.सरपंच अफसरभाई शेख,,

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.