ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचा जिल्हास्तरीय आढावा

0 झुंजार झेप न्युज

 शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची स्थापना करा-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.12: जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचा जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला. प्रत्येक शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची स्थापना त्वरित करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या. बैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, सदस्य ज्येष्ठ नागरिक हनुमंत कुंभार यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना शासन पुरवित असलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली. खाजगी रूग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपजिल्हा रूग्णालयात दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. यापद्धतीने खाजगी दवाखान्यातही बेड राखीव ठेवण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष स्थापन करण्यासाठी महापालिका, नगरपालिकेने, ग्रामपंचायतीने स्थानिक निधीतून तयार करावेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आणि अडीअडचणीबाबत वेळेत कार्यवाही करणे याबाबतही चर्चा झाली. 

शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष 

प्रत्येक शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची स्थापना करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली होती. यावर कारवाई सुरू असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती बार्शी याठिकाणी सहायता कक्षाची स्थापना झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कार्यालयात सहायता कक्षाची स्थापना त्वरित करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या. ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठांना न्याय द्यावा. त्यांचे प्रश्न, तक्रारी या सोडविण्याची मागणी सदस्य हनुमंत कुंभार यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.