श्री रेणुकादेवी कारखान्याचा सातव्या गळीत हंगामाचा बॉयलर सोहळा संपन्न
विहामांडवा,दि.12,किशोर धायकर पैठण प्रतिनिधि: श्रीक्षेत्र चोंडाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या सतव्या गळीत हंगामाचे बोयलर अग्निप्रदीपनचा कार्यक्रम दि. १२ऑक्टोंबर २०२२ बुधवार रोजी सकाळी १० वाजता राजू नाना भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाला. कारखान्याचे रिपेअर व मेंटेनन्स चे काम पूर्ण झाले असून यंदाचा गळीत हंगाम थोड्याच दिवसांमध्ये सुरू करणार सांगितले,त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवून पूर्ण क्षमतेने गाळप करणार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे, रेणुका देवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर,रोहिदास रेवडकर,कार्यकारी संचालक नामदेव बावडकर यांच्यासह व्हा चेअरमन माणिकराव थोरे,संचालक सुभाष चावरे,विष्णू नवथर,संपत गांधले,रावसाहेब घावट,महावीर काला,लहू डुकरे,ज्ञानोबा बोडखे,सुभाष गोजरे,नंदू पठाडे,भरत पवार, कल्याण धायकर,दत्तात्रय वाकडे, मेहबूब सालार पटेल,किशोर भिसे,मच्छिंद्र जाधव,भारत दगडे,चंद्रकांत पाटील,श्रीमंत टेकाळे,रमेश झिरपे,आबासाहेब थोटे, आप्पासाहेब पेरने, सतीश देशमुख,सोमनाथ मुळे,नाना गाभुुडे,रेेणूका शुगर मिलचे श्रीमंतराव टेकाळे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच परिसरातील ऊस बागातदारासह परिसरातील शेतकरीबांधव , ग्रामस्थांची उपस्थिती होती.


