जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

0 झुंजार झेप न्युज

बरंजळा लोखंडे, नळणी, वाटुर, एदलापूर भागातील शेतपीकांची पाहणी

जालना,दि.27: कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे, नळणी गाव परतुर तालुक्यातील वाटुर आणि एदलापूर (ता. जालना) परिसरात शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून त्यांना धीर दिला.नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीने शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता, धीर धरावा. नुकसानभरपाई बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच निर्णय घेतील, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यावेळी तहसीलदार सारिका कदम, तहसीलदार रूपा चित्रक, जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, भूषण शर्मा, शेख नजीर, मोहन अग्रवाल, तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी मंठा विष्णू राठोड, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, पं. स.तालूका कृषि अधिकारी राजेश तांगडे, गट विकास अधिकारी श्री. सुरडकर , कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.