भागीदार राज्याचा ‘महाराष्ट्र दालना’ला पुरस्कार 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा संपन्न

0 झुंजार झेप न्युज

भागीदार राज्याचा ‘महाराष्ट्र दालना’ला पुरस्कार 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा संपन्न

नवी दिल्ली,दि.28 : ‘भागीदार राज्याचा’ पुरस्कार ‘महाराष्ट्र दालना’ला प्रदान करण्यात आला. यावर्षी 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र हे भागीदार राज्य होते. येथील प्रगती मैदानात 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली होती. याचे समापन रविवारी 27 नोव्हेंबरला झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र दालना’ ला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गेनाइजेशन चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप खरोला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘महाराष्ट्र दालन’ यावर्षी हॉल क्रमांक 2, तळमजल्यावर मांडण्यात आले होते.यावर्षीच्या व्यापार मेळयाची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” होती. 

ही संकल्पना मांडताना राज्याचे डिज‍िटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), बचत गट, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत होते. एकूण 45 स्टॉल्स याठ‍ीकाणी मांडण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवर स्टॉल्स होते. बचत गटांचे, काराग‍िरांचे, मध्यम, लघु, सुक्ष्म उद्योगातंर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे आणि स्टॉर्टअप चे स्टॉल्स या ठीकाणी होते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘महाराष्ट्र दिवस’ शनिवारी 26 नोव्हेंबरला येथील खुल्या सभागृहात झाला. यावेळी राज्याच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.