विहामांडवा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंदनगरी मेळावा संपन्न
विहामांडवा,दि.28,(किशोर धायकर पैठण प्रतिनीधी): पैठण तालुक्यातील विहामांडवा-येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच व्यवहारिक ज्ञानदेखील मिळावे म्हणून. आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी १५० ते 200 स्टॉल उभारले होते. शालेय समिती अध्यक्ष प्रल्हाद ऐखंडे व शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून सरस्वती विद्यालयात आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शिक्षणा बरोबरच व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे
शालेय जीवनात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे. कारण जे शिक्षणातून हूकत असतात त्यांना व्यवसायचे ज्ञान येणे गरजेचे आहे. आयोजित आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाँल लावून स्वतःहा बनविलेल्या पदार्थाची विक्री करुन त्यातुन दोन पैसे मिळवले हे खरच कौतुकास्पद आहे. स राबविलेला हा उपक्रम त्यांना भविष्यात नेहमीच चालना देईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी सांगितले.यावेळी शाळेचे समिती अध्यक्ष,सदस्य,शिक्षणप्रेमी,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका,पालक,पञकार बांधव,विद्यार्थी व गावातील नागरिक ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.

