पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम वरील कारवाई

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम वरील कारवाई

पिंपरी चिंचवड,दि.10: राज्यातील स्वच्छ आणि सुंदर शहरांमध्ये आघाडीवर असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची वेगाने प्रगती होत आहे. शहराच्या प्रगतीसोबत शहरातील लोकसंख्या देखील वाढत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शहरामधील सर्व प्रमुख रस्ते अडथळे विरहित असणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे.अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक येथील रावेत बी आर टी एस रस्त्यालगत, क ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रात पुणे नाशिक महामार्ग मोशी टोल नाक्यापर्यंत तसेच ड, ग, आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत वाकड स्मशानभूमी ते वाकड ब्रीज, बी आर टी एस रस्त्यालगत, आज आणि उद्या दि. ११ नोव्हेंबर २०२२ दरम्यान अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे.  

 अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक दरम्यान रावेत बी आर टी एस रस्त्यालगत क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख यांच्या नियंत्रणाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे धडक कारवाई पथक, महाराष्ट्र पोलीस दल, महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे कर्मचारी उपस्थित होते. कारवाई दरम्यान पाच जेसीबी, तीन पोकलेन वापरण्यात आले. यावेळी अग्निशमन पथक, रुग्णवाहिका देखील तैनाद करण्यात आली होती. क, ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नाशिक फाटा ते मोशी टोलनाका दरम्यान अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उप अभियंता सुर्यकांत मोहीते, कनिष्ट अभियंता संदिप वैद्य, अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, रुग्णवाहिका, अग्निशमन पथक तैनाद करण्यात आले होते. यावेळी १३ पत्राशेड, १३ टपरी, ७ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.

ड,ग, आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत वाकड स्मशानभूमी ते वाकड ब्रीज दरम्यान बी आर टी एस रस्त्यालगत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, रुग्णवाहिका, अग्निशमन पथक तैनाद करण्यात आले होते.आज झालेल्या अतिक्रमण निष्कासन मोहिमेत मुख्य रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.