माफी नको राजीनामा द्या कविता आल्हाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्ट मंडळाने राज्यपाल, व मुख्यमंत्री यांची घेतली भेट..

0 झुंजार झेप न्युज

माफी नको राजीनामा द्या कविता आल्हाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्ट मंडळाने राज्यपाल, व मुख्यमंत्री यांची घेतली भेट..

मुंबई,दि.09: मा.खासदार संसदरत्न श्रीमती सुप्रिया ताई सुळे यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यासाठी तसेच, मंत्री गुलाबराव पाटील, रवींद्र चव्हाण यांना पण महिलांविषयी अपमानास्पद बोलण्या संदर्भात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी जी यांच्याकडे महाविकास महिला आघाडीच्या वतीने भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज , शाहू फुले,आंबेडकर अशा थोर महामानवाच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालत आहे आणि या महापुरुषांनी स्त्री ला समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि आत्ताच्या या लोकप्रतिनिधी ना स्वतःच्या या खोकेबाझ सत्तेचा इतका माज आणि मस्ती चढली आहे की प्रत्येक वेळेस हे स्त्रियांचा अपमान करतात . महाराष्ट्रात हे खपऊन घेतले जाणार नाही, आणि आम्हाला मा.अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर माफी नको त्यांचा राजीनामाच हवा आहे . आणि तुम्ही तो राजीनामा त्वरित घ्यावा असे निवेदाद्वारे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील देण्यात आले. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रस्त्यावर उतरून अजून ताकदीने या अशा महिलांचा उपमान करणाऱ्या नेत्याचा निषेध करत तीव्र असे आंदोलन करतील.असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला त्यावेळी माननीय आमदार डॉ. मनीषा ताई कायंदे तसेच शिवसेनेचे अनेक महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा मा.विद्याताई चव्हाण, श्रीमती. वैशाली ताई नागवडे , मा.निर्मला ताई प्रभावळकर ,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा.प्रा.सौ. कविता ताई आल्हाट, निरीक्षक मा.शितलताई हगवणे व अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.