गडचिरोली जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही, 164 कोरोनामुक्त, 61 नवीन कोरोना बाधित

0 झुंजार झेप न्युज

 गडचिरोली जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही, 164 कोरोनामुक्त, 61 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली,दि.01: आज जिल्हयात 61 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 164 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28002 वर पोहचली. तसेच सद्या 675 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 719 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयात एकही मृत्यू नाही. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.26 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.60 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

नवीन 61 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 18, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 16, धानोरा तालुक्यातील 02, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 07, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 06 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 07 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 164 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 26, अहेरी 04, आरमोरी 08, भामरागड 00, चामोर्शी 76, धानोरा 05, एटापल्ली 03, मुलचेरा 16, सिरोंचा 13, कोरची 00, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.