राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त "हेलिकॉप्टर जॉय राईट" उपक्रम
राजगड : हेलिकॉप्टर जॉय राईड या शौर्य पर्यटन उपक्रमात सहभागी होण्याचा आपण घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा उपक्रम दिनांक 12 ते 17 जानेवारी असा आहे.आपण आपल्या सोयीची तारीख बुकींग करावी.जी तारीख उपलब्ध असेल ती आपणाला दिली जाईल. सकाळ आणि दुपार असे दोन स्लॉट आहेत.शिवकालीन भोजन व्यवस्था केली आहे.प्रती व्यक्ती मग ते लहान मुलं असलं तरी विमान कंपनीच्या नियमानुसार पूर्ण तिकीट आकारले जाते. मूल मांडीवर घेणे याला परवानगी नसतेच. हे आपण समजून सहकार्य करावे.ज्यांना रात्री मुक्काम करून राजगड किल्ला पायी जाऊन पाहायचा आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षित कर्तव्य दक्ष गाईड ची व्यवस्था केली आहे.सदर पॅकेज प्रति व्यक्ती 7 हजार आहे. ज्यांना मुक्कामी न राहता फक्त हेलिकॉप्टर जॉय राईड करणे आहे त्यांची शिवकालीन भोजन सह फी 6हजार प्रति व्यक्ती आहे. रात्री शिवकालीन मर्दानी खेळ, पोवाडे किंवा व्याख्यान अशी मनोरंजन, किंवा प्रबोधन अशी व्यवस्था करीत आहोत.
सोबत बारकोड दिला आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा आणि सेव्ह करून ठेवा.हेलिपॅड वर हा पुरावा तपासणी करून पास दिला जातो. त्याला बोर्डिंग पास म्हणतात तो असेल तरच हेलिकॉप्टर मध्ये प्रवेश मिळतो. सोबत आधार किंवा पॅन कार्ड कॉपी फोटो आयडेंटिटी म्हणून असावे. सीटबेल्ट आणि बाकीचे नियम काटेकोर पणे पाळावे लागतातच. सदर हेलिकॉप्टर राईड 8 ते दहा मिनिटाची असते, जवळपास 3600 फूट उंचीवरून आपण संपूर्ण राजगड प्रदक्षिणा तीनशे साठ डिग्रीत करणार आहोत.मोबाईल मध्ये प्रत्येकाला आपला हा अनुभव शूट करता येईल,सेल्फी पण काढता येईल,प्रोफेशनल फोटोग्राफी पण उपलब्ध केली आहे.जेणेकरून प्री wedding लग्न पूर्व शूटिंग,वाढदिवस शूटिंग चा ही शिवप्रेमी ना आनंद घेता येईल अशी व्यवस्था करीत आहोत. ज्यांचा या दरम्यान वाढदिवस असेल त्याच्यासाठी खास शिवकालीन पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.आम्ही सदैव तत्पर असलो तरी ढगाळ हवामान किंवा बदलती नैसर्गिक परिस्थिती किंवा देशात अचानक उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती अश्या अपरिहार्य परिस्थिती हेलिकॉप्टर राईड पुढे ढकलली जाऊ शकली तर पुढील वेळापत्रक मध्ये आपणाला सामावून घेतले जाईल.आपली फी उपयोग होईल असेच पाहिले जाईल. पृथ्वीवरील स्वर्ग अर्थातच राजगड हेलिकॉप्टर ने पाहण्यासाठी आपण सहकुटूंब येणं हे मोठं भाग्याचे काम आहे.जिजाऊ शिवराय 26 वर्ष ,शंभूराजे 16 वर्ष येथे राहून राजाराम महाराज जन्म अश्या अनेक गोष्टीं मुले हा परिसर एवढा पावन झाला आहे की 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य एकाच वेळी आपण पदरात पाडून घेऊ शकतो. बुकिंग कन्फर्म झाले तरी आधल्या दिवशी फोन करणे संपर्क करणे आणि मगच निघावे हळू आणि सुरक्षित प्रवास जाताना येताना करावा.आपण सहकुटूंब आहोत हे लक्षात ठेवून शून्य जोखमीचे कार्य करून हा आनंद घ्यावा.हेलिकॉप्टर राईड चे सर्व नियम काटेकोर पणे पाळून सहकार्य करावे ही नम्र विनंती. बहुत काय सांगावे आपण सुद्न्य आहात.
टीप जानेवारीत राजगड ला जबरदस्त थंडी असते तेव्हा मोजे कानटोपी,स्वेटर असे उबदार कपडे सोबत असावेच, राजगड चढाई करण्यासाठी चांगली ग्रीप असणारे बूट घालावेत सॅंडल, चप्पल घालणे जोखमीचे असते, जास्त करून किल्ला उतरताना तेव्हा दिलेल्या सूचना काटेकोर पाळावयाच्या आहेत आपली सहल यशस्वी, आनंदी ,अविस्मरणीय होण्यासाठी आपण हे जरूर करावे.आपले नम्र शिवसेवक शिवपाईक प्रा. नामदेवराव जाधव फाउंडर इंटरनॅशनल शिवबा सृष्टी
🚩 हेलिपॅड ठिकाण : पाल बुद्रुक राजगड पायथ्याशी: वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी. बुकिंग फर्स्ट कम फर्स्ट बेसिस. गूगल पे नंबर 9860601250 राजमाता प्रकाशन

