पैठण तालुका क्रीडा कार्यालाय पैठण व राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय विहामांडवा यांच्या सयुंक्त विद्यमाने तालुका स्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन.
विहामांडवा,दि.24 (किशोर धायकर पैठण प्रतिनिधि): मानव विकास क्रिडा, संस्कृतिक व शिक्षण प्रसारक मंडळ, विहामांडवा संचलित राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विहामांडवा शाळेत 23 नोव्हेंबर रोजी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन उत्सहात पार पडले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.संजयराजे निंबाळकर दादा यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री. डॉ.प्रा. पी आर थोटे.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सभापती श्री सुरेश दुबाले विहामांडवा सरपंच श्री नागेश आष्टीकर, उपसरपंच श्री.महाविर काला, निवृत्ती पा,गाधले, श्री सोमनाथ टाक सर, श्री सपकाळ सर, जनार्धन हुंडीवाले, श्री सुरेश पाटील सर, बाप्पासाहेब येळे, श्री बाळासाहेब डमाळ सर, श्री निलेश गायकवाड, विजुभाऊ ब्रह्मराक्षस,जिल्हा परिषद शाळा विहामाडवा च्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम, ज्ञानदीप विद्या मंदिर च्या प्राचार्य श्रीमती खोत मॅडम, ग्रा प सदस्य प्रा सदाशिव ब्रह्मराक्षस, ग्रा प सदस्य विनोद निंबाळकर, ग्रा प सदस्य बबन गाभूड, गणेश येळे, ग्रा प सदस्य विकास रोडगे, श्री भाकरे सर, राजेंद्र पा,पन्हाळकर, राजेंद्र पा, भाकरे, कल्याण पानसरे, शंकरभाऊ नाचणं, आयुब शेख सर, इम्तियाज शेख सर, प्रभाकर आवारे, यूसूबभाई शेख, शिवा काका गोर्डे, विजय बोबडे सर, फड सर, गारुळे मॅडम, गावंदे सर, आरेफ शेख सर,कैलास बोडखे, सुदर्शन बोडखे,राजेंद्र पा, गाभुड, श्री परमेश्वर डुकरे, अमोल निकम , नवनाथ गायकवाड सह तालुक्यातील सर्व सहभागी शाळेचे शिक्षक प्रतिनिधी, पंच, टीम मार्गदर्शक प्रशिक्षक खो खो क्रीडा प्रेमी यांची उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.शाळेच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजयराजे निंबाळकर तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपप्रशासकीय अधिकारी प्रा.पी आर थोटे सर यांनी उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.श्री सपकाळ सर यांनी देखील मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहित केले.सामना सरपंच शंकर नाचण, पंच विजय बोबडे सर, आयुब शेख, शिवा काका गोर्डे, राम गोर्डे, साबळे सर, टकले सर, टाईम कीपर इम्तियाज शेख सर, गुणलेखक आबासाहेब गाभूड या कार्यक्रम प्रसंगी पाटेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालयाचा यश गणेश येळे याने प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष सह सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक वृंद सह गावातील खेळाडू, क्रीडाप्रेमी यांचे सहकार्य.
उद्या देखील खो खो स्पर्धेच्या चुरशीच्या लढती होणार आहे तरी क्रिडा प्रेमींनी रंगतदार सामना पाहण्याचा लाभ घ्यावा

