पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पुजन

0 झुंजार झेप न्युज

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पुजन

यवतमाळ,दि.16: यवतमाळ ग्रंथोत्सव 2022 चे आज अभ्यंकर कन्या शाळा येथे ग्रंथ दिंडीचे पूजन करून अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ग्रंथ दिंडीचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते, तसेच जयश्री राऊत माध्यमिक शिक्षणाधिकारी, बाळासाहेब धांदे,प्रसिद्ध उद्योगपती पांडुरंग खानवे, प्रल्हाद इंगळे, उपस्थित होते. ग्रंथदिंडीच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी चांगले विचार, चांगले वाचन आणि चांगली पुस्तकेच माणसाला कायम सोबत करतात. पैसा हा किती कमावला तरी साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे सर्वांनी वाचनाची सवय लावावी. कोरोनामुळे सर्व कार्यक्रमाचे आयोजन बंद करण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रंथोत्सव आयोजित होत आहे. या ग्रंथोत्सवात नागरिकांनी भरपूर पुस्तके खरेदी करावीत आणि मोठ्या प्रमाणात वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन करुन ग्रंथोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. 

पुस्तके आणी फुलांच्या माळांनी सजलेली ग्रंथदिंडी अभ्यंकर कन्या शाळा ते संविधान चौक, एलआयसी चौक ते आझाद हिंद मैदानात ग्रंथ दिंडीचा समारोप झाला. यावेळी पारंपारिक वेशभुषेतील लेझिम आणि बॅंड पथाकाच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर करीत सर्वांचे लक्ष वेधले. यात वीस शाळेतील अडिच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक शाळेचे आकर्षक वेशभूषेतील पथक यामध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.