विहामांडवा-येथे नाताळनिमित्त ख्रिसमस सन मोठ्या उत्साहात साजरा

0 झुंजार झेप न्युज

विहामांडवा-येथे नाताळनिमित्त ख्रिसमस सन मोठ्या उत्साहात साजरा

विहामंडवा,दी.25(किशोर धायकर पैठण प्रतिनीधी) : पैठण तालुक्यातील विहामांडवा-येथे चर्चमध्ये कार्यक्रम घेऊन सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.जवळपास इ.स. ३४५ वर्षांपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात.यावेळी पास्टर आमोल गायकवाड, पास्टर चौथमल, पास्टर आनिल आहीरे, पास्टर आदाम आहीरे यांनी येशूची प्रार्थना घेऊन लोकांना मार्गदर्शन केले,याप्रसंगी राजेंद्र पन्हाळकर,पाडुरंग पवार,तुकाराम आष्टीकर, नितीन ब्रम्हराक्षस,किशोर धायकर, दिपक गायकवाड, आनिल गायकवाड, नितीन गायकवाड, लक्ष्मण आहीरे, आरूण गायकवाड व विहामांडवा-येथील गायकवाड परीवार उपस्थित होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.