जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे उद्घाटन

0 झुंजार झेप न्युज

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा होणार

कोल्हापूर : राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, प्रलंबित कामे, निवेदने व अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्यक्ष नागरिक येऊन देत असतात. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो व ते अर्ज, निवेदने पुन्हा क्षेत्रिय स्तरावरच पाठवले जातात. यामध्ये नाहक दिरंगाई होते, त्यामुळे हे अर्ज, निवेदने जिल्हास्तरावरच घेऊन त्याचा गतिमान पद्धतीने परिणामकारक निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुरुवात करण्यात आली.या कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर, राजूबाबा आवळे, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारी निवेदने, अर्ज, संदर्भ मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरिता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आले. या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी कार्यरत राहणार आहेत. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सादर करावयाचे अर्ज, निवेदने व संदर्भ या कक्षात प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.