पुन्हा एकदा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये

0 झुंजार झेप न्युज

पुन्हा एकदा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये 

मुंबई,दि.08: पुन्हा एकदा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पुन्हा एकदा खणाणला आहे. पुढच्या दोनच महिन्यांत मुंबईत 1993 सारखे स्फोट होणार, अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला आहे. तसेच, मुंबईतील गजबजलेली ठिकाणं म्हणजेच, माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होण्याचा दावा या फोनवर करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई एटीएसनं हा फोन ज्या व्यक्तीनं केलाय त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.