वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळमनुरी येथे प्रीमियर लीगचे आयोजन
महाराष्ट्र : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त प्रीमियर लीगचे सामन्यांचे पारितोषिक राजू कांबळे वंचित बहुजन आघाडी ता.महासचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आले..!यावेळी प्रथम पारितोषिक 21 हजार सेवानगरी रामेश्वर तांडा डॉ.दिलीप मस्के साहेब पूरूस्कृत संतोषभाऊ काशिदे यांच्या हस्ते,द्वितीय पारितोषिक 15 हजार वंचित कार्यकर्ते प्रभाकर थोरात व सरपंच तोंडापुर सोपान काका थोरात यांच्या हस्ते दोस्ताना क्रिकेट क्लब,तृतीय पारितोषिक सरपंच राहुल दादा थोरात वारंगा फाटा 9 हजार स्ट्रायकर टीम, तोंडापूर, चतुर्थ ब्लू स्टार पावनमारी 7 हजार वंचित तालुका महासचिव राजू कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे ता.सचिव प्रविण भाऊ थोरात,बाबाराव दादा थोरात, संघाभाऊ थोरात,विशाल थोरात व समस्त वंचित बहुजन आघाडीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

