बहुजन समाज पार्टी वतीने एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

0 झुंजार झेप न्युज

बहुजन समाज पार्टी वतीने एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पुणे,दि.28: बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील नवयुवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ हुलगेश चलवादी यांनी केले. प्रशिक्षक म्हणून बसपा प्रदेश महासचिव सुदीप जी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सचिव शीतल गायकवाड उपस्थित होते. 

प्रशिक्षण शिबीर आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महंमद शफी, पुणे जिल्हा सचिव सुरज खैरकर, पुणे जिल्हा पदाधिकारी मिलींद भोसले, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष संदीप कांबळे, महासचिव नितेश गायसमुद्रे, व जबाबदार पदाधिकारी यांनी केले.प्रशिक्षण शिबीरास पुणे शहर प्रभारी राजेश इंद्रेकर, पुणे शहर उपाध्यक्ष तन्वीर सय्यद, पुणे शहर युवक आघाडी अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, पुणे शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वंजारे इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबीरानंतर नवीन पदाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली. वडगाव शेरी विधानसभा पदाधिकारी यांचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.