राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा

विहामांडवा,दि.20(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी या शिव उत्साहात सामील झाले.या उत्सवाचे आकर्षण ठरले ते छत्रपती शिवाजी महाराजाची वेशभूषा सह मावळे, झांज पथक, ढोल पथक, वारकरी संप्रदाय. सकाळी ०८ वाजल्यापासून ढोल, झांज, मृदंग, टाळ च्या गजरामध्ये गावामधून स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची मिरवणूक भव्यदिव्य आणि जल्लोषात काढून विद्यालयाच्या प्रांगणात साजरी झाली.या शिव जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच तथा जिजाऊ विद्यालयाचे संस्थापक/अध्यक्ष संजयराजे निंबाळकर दादा, प्रमुख अतिथी सरपंच नागेश आष्टीकर, ग्रा.पं.सदस्य प्रा.सदाशिव ब्रह्मराक्षस सर, ग्रा.पं.सदस्य भाकरे सर, ग्रा.पं.सदस्य पांडूरंग पवार, ग्रा.पं.सदस्य विनोदराजे निंबाळकर, प्रभाकर आवारे, विजय ब्रह्मराक्षस, नजीर शेख, यूसुफ शेख, कल्याण पानसरे, पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस, पत्रकार शब्बीर शेख, दिपक साठे, मोरे नाना, हरीभाऊ रोडगे, सुशील थोरे, बाबासाहेब आंधळे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत "जय जय महाराष्ट्र माझा" या गीतानेझाली. 

शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे संस्थापक संजयराजे निंबाळकर दादा सह ग्रा.पं.सदस्य प्रा.सदाशिव ब्रह्मराक्षस सर यांनी महाराजांचा जिवंत इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक खेडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, अमरदीप डुकरे, इकबाल शेख, सुरेश दुभळकर, सचिन घाडगे, केदार बोडखे, कृष्णा तांबे, श्रीमती ज्योती कचे, श्रीमती चव्हाण मॅडम आदीनी परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.