भाजप,आघाडीच्या भूलथापांना चिंचवडची जनता बळी पडणार नाही - राहुल कलाटे

0 झुंजार झेप न्युज

भाजप,आघाडीच्या भूलथापांना चिंचवडची जनता बळी पडणार नाही - राहुल कलाटे

पिंपरी चिंचवड,दि.20: भाजप, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी शहरात येवून भूलथापा मारतील. नेहमीप्रमाणे आश्वासनांचा पाऊस पाडतील. पण, दोनही पक्षांनी चिंचवडमधील प्रश्न तडीस नेले नाहीत. चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करु शकले नाहीत. जनतमेध्ये संताप आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजप, आघाडीच्या भूलथापांना चिंचवडची जनता बळी पडणार नाही असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.चिंचवडच्या पोटनिवडणुकीला अपक्ष शिट्टी चिन्हावर राहुल कलाटे सामोरे जात आहेत. चिंचवडमध्ये सर्वत्र शिट्टीचे वारे वाहत आहे. मोठ्या-मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांपासून उपनगरांमध्ये शिट्टीचा आवाज घूमत आहे. कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली.

रावेत पुनावळे रहाटणी थेरगाव या परिसरात पदयात्रा बैठका व भेटीगाठी घेऊन मतदारांसोबत संवाद साधला.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित संपूर्ण चिंचवड मतदारसंघ कलाटे पिंजून काढत आहेत. मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रांगोळी काढून, फुलांची उधळण, औक्षण करत कलाटे यांच्या नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. राहुलदादा यावेळी आम्ही तुम्हालाच मत देणार असा विश्वास मतदारांकडून दिला जातो. जनतेचा मिळणार प्रतिसाद, प्रेम पाहता माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.चिंचवड मतदारसंघामधील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून या प्रश्नांचे भिजत घोंगडे कायम आहे. शास्तीकरांचा जाच सहन करावा लागत आहे. घरांवरील टांगती तलवार कायम आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने या प्रश्नांवर केवळ राजकारण केले. प्रश्न मात्र तडीला लावला नाही. दररोज पाणीपुरवठाही देवू शकत नाही. यामुळे चिंचवडकरांमध्ये दोनही पक्षांच्या विरोधात रोष आहे. त्यामुळे भाजप, आघाडीच्या भूलथापांना बळी न पडता यावेळी चिंचवडमध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार चिंचवडच्या जनतेना केला असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.