उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा सन्मान

0 झुंजार झेप न्युज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा सन्मान

पुणे,दि.12: पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२२'च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा पानी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमात सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला.कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते.कृषि विभागाने पानी फाऊंडेशनच्या स्थापनेपासून विविध उपक्रमात सहकार्य केल्याचे यावेळी आमिर खान यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.