पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’!

0 झुंजार झेप न्युज

- ‘बूथ सशक्तीकरण अभियान’; आमदार लांडगे यांचे मार्गदर्शन

- शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती

पिंपरी चिंचवड,दि.12: पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथनिहाय जबाबदारी आणि कर्तव्य निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. आगामी महापालिका निवडणुकीत ‘अब की बार १०० पार’चा निर्णया भाजपाने केला आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.‘‘बूथ सशक्तिकरण अभियान’’ ची सुरूवात आणि प्रशिक्षण बैठक भोसरी विधानसभा मतदार संघात घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विलास मडिगेरी, संतोष लोंढे, निगडी- चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके,सुरेश म्हेत्रे, हनुमंत लांडगे आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षण बैठकीमध्ये बूथ सशक्तीकरण अभियान पीपीटी प्रेझेंटेशन करण्यात आले. तसेच, बूथमधील कार्य, सर्व समाज घटकांचा विचार करून ३० कार्यकर्त्याची यादी तयार करणे व सत्यापित करणे, बूथ समितीमधील ११ कार्यकर्त्यांचे कार्य विभाजन, मन की बात प्रमुखाची कामे, लाभार्थी संपर्क प्रमुख, कार्यक्रम प्रमुख यांच्यासह पेज प्रमुखांच्या कामाचे नियोजन करण्यात आले. तसेच, भाजपाच्या ‘सरल’ ॲपबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ‘मन की बात’ बूथ बैठक दर महिन्याला निश्चित करण्यात आली. येत्या २६ मार्च रोजी प्रत्येक बूथमध्ये आणि ३० एप्रिल रोजी 'मन की बात' चा १०० वा कार्यक्रम प्रत्येक गावात भव्य आणि नाविन्यपूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.प्रशिक्षण बैठकीत सूत्रसंचालन भोसरी चऱ्होली मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केले. तर दक्षिण भारत आघाडी अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया : 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ सुरू करण्यात आले. त्याची प्रशिक्षण बैठक भोसरीत पार पडली. पक्ष संघटन आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. आगामी काळात संपूर्ण शहरात असे अभियान पक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. - महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.