भोसरीचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांना 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी

0 झुंजार झेप न्युज

भोसरीचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांना 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी खंडणी रक्कम दिले नाही तर खुणाचीही धमकी देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड,भोसरी,: भोसरी विधानसभा लाडके आमदार महेश लांडगे यांना परिवर्तन हेल्पलाइन ह्या त्यांच्या नागरिक समस्या निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल नंबर 30 लाख खंडणी रक्कम मागणी करण्यात आली असून खंडणी रक्कम दिली नाही तर खुणाची धमकी देण्यात आली आहे यापूर्वी सुद्धा महेश लांडगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्यावेळी भोसरी पोलिसांनी काही गुंडा प्रवृत्तीच्या लोकांना अटक करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय आमदार महेश लांडगे यांना विशेष सुरक्षा व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ताबडतोब दाखल घेऊन पुरवण्यात यावी.

सचिन काळभोर म्हणाले,...

गेला आठवडा दहा महिन्यापासून महाराष्ट्रात आमदार सुरक्षित नाहीत जयकुमार गोरे तसेच रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्या सुरक्षारक्षक बरोबर असताना सुद्धा अपघाती घटना घडल्या असून विनायक मेटेे यांचे अपघात निधन झाले आहे. आमदार महेश लांडगे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमदार माझा सुरक्षित नसून ताबडतोब उपाययोजना करून झेड प्लस दर्जाची सुरक्षा आमदार महेश लांडगे यांना देण्यात यावी तसेच गेल्या काही वर्षांपूर्वी सुद्धा आमदार महेश लांडगे यांच्या खुनाचा कट रचना आला होता. त्या सर्व गोष्टी सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.