खेलो इंडियात बॉक्सिंगमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; शंकर जगताप यांनी केला सत्कार

0 झुंजार झेप न्युज

खेलो इंडियात बॉक्सिंगमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; शंकर जगताप यांनी केला सत्कार

पिंपरी चिंचवड,दि.05: “खेलो इंडिया” या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे हिने सुवर्णपदक, तर श्रेया धांदर हिने कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हरियाणातील रोहटक येथे विविध प्रकारच्या खेळांसाठी “खेलो इंडिया” ही राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच झाली. त्यातील बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे व श्रेया धांदर या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीबद्दल भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच प्रशिक्षक राहुल पाटील यांचाही त्यांनी विशेष सत्कार केला. या खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकादमीचे अध्यक्ष माऊली जगताप, प्रशिक्षक राहुल पाटील, संदीप धांदर, अनिकेत दळवी, विशाल लायगुडे, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.