पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ

0 झुंजार झेप न्युज

सर्व पात्र लाभार्थ्यांना 14 एप्रिल 2023 पर्यंत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार

कोल्हापूर,दि.05: जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करुन करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार श्रीमती जयश्री जाधव, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 राज्य शासनाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे व त्याचे वाटपही राज्यात सर्वत्र सुरु आहे. तरी याची कोल्हापूर जिल्ह्यातही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची पुरवठा विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटप अंतर्गत जवळपास 75 टक्के शिधा प्राप्त झाला आहे. उर्वरित शिधा दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. या शिधा जिन्नसमध्ये रवा, साखर, चणाडाळ व पामतेलचा समावेश आहे. दिनांक 14 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. कवितके यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.