पिंपळेगुरवमध्ये शास्त्रीय आणि कलात्मक संगमाचा जीवन संगीत कार्यक्रम उत्साहात

0 झुंजार झेप न्युज

पिंपळेगुरवमध्ये शास्त्रीय आणि कलात्मक संगमाचा जीवन संगीत कार्यक्रम उत्साहात

पिंपरी चिंचवड,दि.17: पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व दिवंगत लौकिकभाऊ माटे यांच्या स्मरणार्थ माटे अँड सन्स सोशल फौंडेशन व सांगवी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगृहात डॉ. संतोष बोराडे प्रस्तुत तसेच आनंद, आरोग्य आणि अध्यात्माचा सुरेल शास्त्रीय आणि कलात्मक संगम असलेला "जीवन संगीत" हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक विजय लांडे, शासकीय अधिकारी महेश माटे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अध्यक्ष डॉ. पी. एल. खंडागळे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, भाजप प्रभाग ३१ चे अध्यक्ष सखाराम रेडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, माटे अँड सन्स सोशल फौंडेशनचे संचालक ओंकार माटे, मनीष पंडित आदी उपस्थित होते.

सांगवी, पिंपळे गुरव येथील माटे अँड सन्स सोशल फौंडेशनचे संचालक ओंकार माटे गेली अनके वर्ष सातत्याने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. रक्तदान शिबीर, गरजू व गोरगरीबांसाठी सतत मदतीचा हात देत असतात. कोरोनाच्या काळात पाच हजाराहून अधिक पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, नागरिक आदींना मास्क व अत्यावश्यक किट वाटप करण्यात आले. माटे अँड सन्स सोशल फौंडेशनला पुढील वाटचालीत असेच विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.