मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

0 झुंजार झेप न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.  मुख्यमंत्री श्री शिंदे आज पासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज सायंकाळी त्यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री शिंदे यांचे स्वागत केले. तसेच, उत्तर प्रदेश वासियांनी श्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री तसेच आमदार या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या अयोध्या येथे 'प्रभू श्री रामचंद्र' यांचे दर्शन घेतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.