आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ऑल इंडिया पँथर सेना खंबीरपणे उभी राहणार.

0 झुंजार झेप न्युज

आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ऑल इंडिया पँथर सेना खंबीरपणे उभी राहणार.

महाराष्ट्र: चळवळीतील सहकारी तसेच कळमनुरी तालुक्यातील युवा नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका महासचिव राजु भाऊ कांबळे यांच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी ऑल इंडिया पँथर सेना हिंगोलीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. राजुभाऊ कांबळे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर खोटे गुन्हे प्रशासनाकडून दाखल करण्यात आले आहेत. 

आंबेडकरी कार्यकर्त्यांची अशा प्रकारे करण्यात येणारी मुस्कटदाबी अजिबात सहन केल्या जाणार नाही. ऑल इंडिया पँथर सेना राजु भाऊ कांबळे तसेच सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभी असुन प्रशासनाने अशा प्रकारे आंबेडकरी कार्यकर्त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पँथर सेना हिंगोली जिल्हाप्रमुख राहुल भाऊ पुंडगे, युवा नेते नितीन भाऊ खिल्लारे, हिंगोली ता. अध्यक्ष सतीश भाऊ इंगळे, प्रसिद्धी प्रमुख गजानन ठोके,कपिल भोकरे , राहुल खंदारे इ. उपास्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.