सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पूलाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते लोकार्पण

0 झुंजार झेप न्युज

पुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व गतीने होणार

सांगली,दि.14: सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व गतीने होईल. तसेच या पुलामुळे नागरिकांच्या जाण्या-येण्याची अडचण दूर झाली असल्याचे मत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. 

कार्यक्रमास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, रेल्वे प्रशासनाचे उपमुख्य अभियंता सागर चौधरी, कार्यकारी अभियंता शंभू चौधरी, पृथ्वीराज पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. खाडे यांनी त्यांना धन्यवाद दिले व आजपासून हा रेल्वे पूल वाहतूकीसाठी खुला झाल्याचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.