राजधानीत वीर महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी
नवी दिल्ली,22: वीर महाराणा प्रताप सिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमात परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी श्री. अभिषेक जाधव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

