कार्यकर्त्यावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : दशरथ आडसूळ

0 झुंजार झेप न्युज

तहसिल कार्यालयावर निदर्शने दरम्यान केले वक्तव्य 

पैठण,दि.22: यापुढे तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही कार्यकर्त्यावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही .जशाच तसे उत्तत देण्यास आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन आंबेडकरवादी अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतिने आयोजित तहसिल कार्यालयावर निदर्शने दरम्यान केले .यावेळी सर्व फुले शाहू आंबेडकर विचाराचे पक्ष व सामाजिक संघटनेचे प्रमूख पदाधिका-यांची उपस्थिती होती.तालुक्यातील एम आय डि सी पोलिस ठाण्याचे सपोनि भागवत नागरगोजे हे जानीव पुर्वक आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपमानास्पद

वागणूक देत असून काही कार्यकर्त्यांना अमाणूसपणे मारहान केल्याचे प्रकार घडले असल्याने सपोनि नागरगोजे यांच्यावर निलबंनाची कारवाई करून अँट्रॉसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह घरकुलाचा समान निधी ,गायरान जमिनी व गावठान विस्ताराच्या मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार यांना आंबेडकरवादी आत्यार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले .

पुढे बोलतांना आडसुळ म्हणाले की ,पोलिस प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी व समाजात शांतता अबाधित राहावी यासाठी असते .कुठल्याच जातीचे व धर्माचे समर्थन त्यांनी केले नाही पाहिजे .मात्र सपोनि भागवत नागरगोजे हे या बाबीला अपवाद आहेत .जातिवादी मानसिकता ठेवून सपोनि नागरगोजे असे कार्यकर्त्यांना लक्ष करीत असतील तर खपवून घेतले जाणार नाही.नागरगोजेवर कारवाई नाही झाल्यास . लवकरच तालुकास्तरीय व्यापक मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला .यावेळी भिमराव गायकवाड , जगन्नाथ साळवे ,नंदकिशोर मगरे ,बाबासाहेब गायकवाड ,सुनिल आडसूळ ,संजय खडसन ,सुनिल साळवे ,नितिन भिसे ,गौतम सोनवणे ,मंगल साळवे ,पंकज गायकवाड ,कृष्णा शेळके ,वच्छलाबाई गायकवाड ,शोभाबाई खंडागळे ,किरण घाटविसावे ,संजय सदावर्ते आदीसह मोठ्या प्रमाणात महिला व पुरूषांची उपस्थिती होती .

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.