महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

0 झुंजार झेप न्युज

महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड,दि.31: महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मनपा भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, आण्णा बोदडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय भोजने,बापू गायकवाड, उप अभियंता बाळासाहेब शेटे,संध्या वाघ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, उमेश बांदल,नितीन समगीर, चारुशीला जोशी,सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने,संजय कवितके,रोहिदास पोटे, संजय शेंडगे, अच्युत लेंगरे , संजय नाईकवडे, दिलीप कवितके, विठ्ठल कवितके, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, श्रेयश जाधव, मनपा कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सांगवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्शल ढोरे, माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, शारदा सोनावणे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती सागळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अजय बिरू दुधभाते, सुर्यकांत गोफणे, जवाहर ढोरे,हिरेन सोनावणे,अभिमन्यू गाडेकर, मनोजकुमार मारकड, सुधाकर सूर्यवंशी, मारुती भोलेकर, नवनाथ भिडे, विलास पाटील, विजयकुमार हारनोळ, नारायण भुरे, गोरेकाका, बळीराम घोडके, ज्ञानेश्वर भगत, कृष्णराव गिरगुणे, मेजर संभाजी गोफणे, माणिकराव देवकाते, विनायक पिंगळे, टेकाळेकाका आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.