बोपोडी येथे अद्ययावत डायलिसिस सेंटर उदघाटन सोहळा संपन्न.

0 झुंजार झेप न्युज

बोपोडी येथे अद्ययावत डायलिसिस सेंटर उदघाटन सोहळा संपन्न.

  

पुणे,दि.01: बोपोडी,औंध व खडकी परिसरात डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून खाजगी डायलिसिस रुग्णांना परवडणारे नाही त्यातच डायलिसिसची सुविधा परिसरात उपलब्ध नसल्याने मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी विशेष प्रयत्न करून पुणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ पुना डाउनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना,बोपोडी,पुणे -०३ येथे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या शहरी गरीब रूग्णासाठी सवलतीच्या दरात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त नवनिर्मित डायलिसिस युनिट कार्यान्वित करण्यात आले.या प्रकल्पाचे

उदघाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाऊनचे जिल्हा गव्हर्नर डॉ. अनिल परमार,मा.उपमहापौर सुनिता वाडेकर,पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना बळीवंत,रोटरी क्लब ऑफ पुना डाउनच्या अध्यक्षा डॉ. झिमरा इस्रायल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या डायलिसिस यंत्रणेसाठी मा.उपमहापौर सौ.सुनिता वाडेकर आणी रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउनच्या *अध्यक्षा डॉ.झिमरा इस्रायल* यांनी पाठपुरावा केल्यावर रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात आला.

या आरोग्य सुविधेचा फायदा बोपोडी,खडकी,औंध,दापोडी,रेंजहिल्स व आजुबाजूच्या भागातील गरजू रुग्णांना होणार आहे,असे प्रतिपादन यावेळी मा.उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी केले.या प्रसंगी उपमहापौर सुनिता वाडेकर' रिपाईं नेते परशुराम वाडेकर' आमदार सिद्धार्थ शिरोळे,रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊनचे जिल्हा गव्हर्नर डॉ.अनिल परमार,पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.कल्पनाताई बळीवंत,रोटरी क्लब ऑफ पुना डाउनच्या अध्यक्षा डॉ. झिमरा इस्रायल रोटेरियन श्री.अनिल गोयल, रोटेरियन डॉ.पल्लवी साबळे, रोटेरीयन डॉ.राजीव वाखले, रोटेरियन डॉ.माधव बोराटे, रोटेरियन डॉ.समीर गोसावी, रोटेरियन प्रोबीर मित्रा,खेडेकर हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती बढीये मा.नगरसेवक आनंद छाजेड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा.नगरसेवक दुर्योधन भापकर शिवाजी नगर मतदारसंघाचे अध्यक्ष मा.अविनाश कदम,आण्णा आठवले,नंदाताई निकाळजे,कलावती भंडारे मावशी निर्मलाताई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमहापौर सुनिताताई परशुराम वाडेकर मित्र परिवार व रिपब्लिकन पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे निवेदन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.