◾लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरूच..!
पुणे,दि.16: पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून या वर पोलीसां चे अर्थीक हितसंबंध गुंतलेले आहेत असा आरोप युवा कामगार सेनेच्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला होता. त्यांनी आपल्या निवेदनात पूढे म्हटले होते की या परिसरात मोठ्या प्रमाणात हातांवर काम करून आपलीं उपजिवीका भागवणारे नागरिक या ठिकाणी रहातात या धंदयामूळे येथील रहिवाशांमध्ये नेहमीच वाद होत असून या अवैध धंद्यामूळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौकाचौकात पत्र्याची शेड टाकून अवैध देशी दारू, मटका जुगार चालवला जात आहे. हे धंदे त्वरीत बंद केले नाही तर युवा कामगार सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही या निवेदनात देण्यात आला होता.
यावर पोलिसांनी मात्र झोपेचे सोंग घेऊन डोळे झाक केलेले आहे यातच पोलिसांचा कर्तव्य दिसून आलं यावर आता पुणें पोलीस उपायुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देऊन युवा कामगार सेनेच्या वतीने फार मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवा कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी "खरा सामना " शी बोलताना सांगितले मोठमोठ्या गप्पा मारणारे गृहमंत्री या गोरख धंद्याकडे लक्ष देतील का अशी विचारणा कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

