तीनही ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वॉर्डशाखेचे उदघाटन
पिंपरी चिंचवड,दि.21(गौतम मोरे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी) : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक- बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक-आद मीराताईं आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष-आद चंद्रबोधी पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष- आद भीमराव य आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा अंतर्गत तालुका फ प्रभाग यांच्या वतीने दि. 18/06/2023 रोजी राजरत्न बौद्ध विहार, विश्वरत्न बौद्ध विहार आणि श्रावस्ती बौद्ध विहार मिलिंद नगर सेक्टर नं. 22 या सर्व तीनही ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वॉर्डशाखेचे उदघाटन तालुका फ प्रभाग चे अध्यक्ष आयु. मच्छिन्द्र कदम गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी तालुका फ प्रभाग ची कार्यकारणी अध्यक्ष - मच्छिंद्र कदम,सरचिटणीस - हरेंद्र साळवे,कोषाध्यक्ष - गौतम रिकीबे,उपाध्यक्ष (संस्कार ) भिमराव सुरवसे उपाध्यक्ष (संरक्षण ) अशोक कदम सचिव( पर्यटन प्रचार)-सुमित वाघमारे,हिशोब तपासणीस -संजय चव्हाण,संघटक- अशोक गायकवाड,अरुणा रणदिवे,अजिनाथ धेंडे,दगडू ढवळे तसेच पिंपरी चिंचवड जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र आचलकर, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दिपक भालेराव, सर्व बुद्ध विहारातील कार्यकर्ते, महिला उपसिका आणि समता सैनिक दलाचे सैनिकवैशाली गोखले,रेश्मा वाघमारे,जगन्नाथ खंडकर,शिवशरण गायकवाड,सायली डोंगरे,तन्वी कदम,उपस्थित होते.

