ग.दी. मांडगुळकर नाट्यगृहात होतोय सेवा सुविधांचा अभाव..

0 झुंजार झेप न्युज

ग.दी. मांडगुळकर नाट्यगृहात होतोय सेवा सुविधांचा अभाव..

पिंपरी चिंचवड,दि.21: महानगरपालिके अंतर्गत असेलेल्या ग.दी.मांडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी मे महिन्यामध्ये नगरसेवक श्री.अमित गावडे यांनी कार्यक्रम घेतला तेव्हा ऑडीटोरीयम ए.सी. बंद होते मात्र महानगरपालिकेने दिनांक ०८ जून आणि ०९ जून २०२३ रोजी भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी तेथील ए.सी.ची सुविधा व्यवस्थित चालू होती त्यांनंतर दिनांक १७ जून २०२३ रोजी झी मराठी तर्फे उत्सव नात्यांचा कार्यक्रमाच्या दिवशीच तो अचानक बंद पडला ? महानगरपालिका व इतर सामांन्य कार्यक्रमांमध्ये प्रशासनाकडून असा भेदभाव का ? असा सवाल आम्हांला पडला आहे. नाट्यगृहाचे दरवाजांना हॅन्डल नसल्याचे तसेच तेथील इलेक्ट्रीक ए.सी. सेवा उपकरण बंद पडल्याने कार्यक्रम आयोजकांनी व्यवस्थापकांना सांगितले असता त्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे नाट्यगृहात ए.सी. सेवा असताना देखील ए.सी. सेवे अभावी कार्यक्रम घ्यावा लागला, सेवेच्या कमतरतेमुळे प्रेषकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानरगपालिकेच्या नियमानुसार सर्व भाडेवाढ रक्कम भरूनही जर सेवा मिळत नसतील तर, महानगरलिका जनतेची फसवणूक करत आहात असे म्हणायला हरकत नाही.

तरी काम नको असणाऱ्या व उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या व्यवथापक, कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी व नाट्यगृहात नियमानुसार असलेल्या सर्व सेवा सुविधा तत्काळ चालू कराव्यात, अशी मागणी अर्बन सेल प्रदेशाध्यक्षा खासदार ॲड.सौ वंदनाताई चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि शहराध्यक्ष मा.अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने अर्बन सेल अध्यक्षा मनिषा गटकळ व सहकार्यकारीणी यांनी आपल्या ‍निवेदन पत्राद्वारे केली आहे.सदर ‍निवेदन देतांना अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ, निरीक्षक-पल्लवीताई पांढरे, निरीक्षक-लताताई ओव्हाळ, निरीक्षक-सुनीताताई अडसूळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष-मनिषा जडर, चिंचवड़ विधानसभा अध्यक्ष-प्रियाताई देशमुख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष-विजयाताई काटे, शहर कमिटी समन्वयक- शोभा उघडे, निशा जामदार, मीरा कांबळे, शोभा औटी, रिनाज शीकलगार, सोनाली नितनवरे, युवक समन्वयक-मेघराज लोखंडे, सरचिटणीस राजन नायर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.