महापालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी चिंचवड,दि.01: महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मध्ये झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता चंद्रकांत कुंभार तसेच सिताराम राठोड, वसीम कुरेशी, बालाजी राठोड, रवी राठोड, रघुनाथ चव्हाण, अंकुश लोहकरे आदी उपस्थित होते.
