जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 

पिंपरी चिंचवड,दि.19: पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने शालेय क्रीडा स्पर्धा २०२३ - २४ ची सुरवात करण्यात आली.दिवंगत बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथे क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, स्पर्धाप्रमुख तसेच क्रीडा पर्यवेक्षक आत्माराम महाकाळ, दिपक कन्ह्रेरे, अरुण कडूस, हरिभाऊ साबळे, भाऊसाहेब खैरे व मंगल जाधव उपस्थित होते.

उपआयुक्त लोणकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मेस्सी, रोनाल्डो, मँराडोना यासारख्या महान खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत व पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडावी असे सांगितले. हरिभाऊ साबळे यांनी सर्व खेळाडूंना सचोटीने व खेळाडू वृत्तीने खेळण्याची शपथ दिली.या स्पर्धेत १४ वर्षे मुले ४२ संघ व ६७२ खेळाडू तसेच १७ वर्षे मुले ४२ संघ व १७ वर्षे मुली २४ संघ सह्भागी झाले आहेत. एकूण १७२८ विद्यार्थी खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत अशी माहिती क्रीडा विभागाने दिली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.