महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन

पिंपरी चिंचवड,दि.24: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते.आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ७० तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १६,११, ४, २, ६, ११, १० आणि १० तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये पावसाच्या साठलेल्या पाण्याचे नियोजन करावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, शहरपरिसरात वेळोवेळी किटकफवारणी करण्यात यावी, बसथाब्यांचे नुतनीकरण करण्यात यावे, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन्स दुरूस्त करण्यात याव्यात अशा तक्रारींचा प्रामुख्याने समावेश होता.

महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाचे स्थलांतर झाले असल्याने नवीन प्रभाग इमारतीत पहिलीच जनसंवाद सभा पार पडली, त्यासही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.