भीमशक्ती विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभेची बैठक पार पडली.
पिंपरी चिंचवड,दि.25: भीमशक्ती विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभेची बैठक वाल्हेकरवाडी चिंचवड येथे भीम शक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरजभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी भीम शक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष श्री. अरुणभाऊ तरकसे उपस्थित होते.
यावेळी भीम शक्ती विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी श्री.अविनाश नागराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच भीम शक्ती विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी श्री.नागेश बसवराज गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच भीम शक्ती विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा सचिवपदी श्री. रोहित सुभाष पाखरे यांची नियुक्ती करण्यात आली..

