जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट
रत्नागिरी,दि.20: जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देवून पाहणी केली.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी यावेळी कक्षातून चालणारे कामकाज विशेषत: पब्लिक ॲड्रेस सिस्टीमबाबत माहिती दिली.

