पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेच्या अनधिकृत कामाच्या विरोधात आझाद मैदान येथे उपोषण
खेड,पुणे,दि.20(बबनराव खेसे खेड प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागत आहे परंतु फक्त मेहनत करून किंवा शेतकरी खरा असून त्याला न्याय मिळत नाहीये कारण पुणे जिल्ह्यातील पुनर्वसन शाखा ही पूर्णपणे फक्त पैसे घेऊन चुकीचे काम करत आहे याची वारंवार तक्रार दिली गेली परंतु पुणे जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालय फक्त चुकीचं काम आणि काही भूमाफियांच्या सांगण्यावरून चालतं चुकीचे प्रकल्पग्रस्त चुकीची कागदपत्र तसेच चुकीच्या लोकांना हाताशी धरून चांगल्या जमिनी वाटप करून घेणे तसेच वाटप करत असताना संचिका गायब करणे तसेच पुनर्वसन कार्यालयातील जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करणे फक्त पैसे घेऊन काम करणे असे काम व त्या सर्व चुकीच्या कामाचे कागदपत्र सहित पुरावे देऊन देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात.
नाही त्यामुळे येत्या काळात लोकशाही संपली याचा प्रत्यय सरकारी अधिकारी आता देत आहेत अशा चुकीच्या प्रकल्पग्रस्तांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या भामट्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जावी म्हणून दिनांक 19 जुलै 2023 पासून आम्ही आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत डोसा आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन पाठीमागे घेतला जाणार नाही असे संघटनेच्या वतीने ठामपणे सांगण्यात येत
प्रतिक्रिया :
जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर कारवाई होत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
-प्रसाद घेनंद संस्थापक अध्यक्ष कृषी युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य)

