पिंपरी चिंचवड शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!

0 झुंजार झेप न्युज

• भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा नियोजनात पुढाकार 

• ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातील 3 हजार नागरिकांची उपस्थिती

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो टप्पा दोन, 'वेस्ट टू एनर्जी’, आणि आवास योजनेच्या लोकार्पण व भूमिपूजन

पिंपरी चिंचवड,दि.31: राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प , सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार घरांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत. अशी माहिती भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी आहे. उद्योगधंद्यांच्यानिमित्ताने या शहरात राज्याच्या विविध भागातून नागरिक कामानिमित्ताने स्थायिक झाले. या कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने महापालिकांना पाठबळ दिले.प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवली.

बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १२८८ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यांचे लोकार्पण व डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने ११९० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडीतील १२८८ घरांचा चावी वाटप कार्यक्रम आणि डुडूळगाव व प्राधिकरण सेक्टर-१२ मधील प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

आवास योजनेतील लाभार्थी याशिवाय शहरातील नागरिक, भाजप पदाधिकारी अशा तीन हजार जणांची या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. यासाठी सर्व बूथ कमिटी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहे.

एकीकडे शहरातील आपल्याच बांधवांना हक्काचा निवारा देत असताना दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन "वेस्ट टू एनर्जी"सारखा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ही गोष्ट शहराच्या विकासाच्या मापदंडाला वेगळी उंची देणारी आहे. शहर नियोजनाची पुढील पन्नास वर्षे लक्षात घेता नागरिकांना हक्काचे घर, त्यांचे आरोग्य आणि मेट्रोसारखा उपक्रम शहरात सुरू होत आहे यातून सार्वजनिक वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शहर नियोजनाच्या दृष्टीने या गोष्टी अत्यंत उपयुक्त असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामध्ये आपल्या शहराला या गोष्टींचा लाभ मिळत असून ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. 

-शंकर जगताप,शहराध्यक्ष,भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.