पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली ‘शासन आपल्या दारी’

0 झुंजार झेप न्युज

कार्यक्रमासाठी संभाव्य जागांची पाहणी - दादाजी भुसे 

नाशिक,दि.06: जिल्ह्यात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ संभाव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज शहरातील डोंगरे वसतीगृह मैदान, संभाजी स्टेडियम व तपोवन येथील जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समेवत जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त भाग्यश्री बानाईत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

शासन आपल्या दारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमासाठी जागा अंतिम करण्याकरीता सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे पाहणी केलेल्या जागांवर पार्कींग व्यवस्था, स्टॉल्स, वैद्यकीय कक्ष व कार्यक्रमाच्या दृष्टीने अनुषंगिक सोयी-सुविधांच्या व्यवस्थेबाबत देखील पालकमंत्री श्री.भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.