महापालिकेच्या आर आर आर केंद्राचे उद्घाटन

0 झुंजार झेप न्युज

महापालिकेच्या आर आर आर केंद्राचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड,दि.06: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. १० मधील (नाना-नानी) कापसे उद्यान, मोरवाडी येथे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नुतनीकरण, पुर्नवापर आणि पुर्नउत्पादन (आर आर आर) केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, स्वच्छ भारत कक्ष समन्वयक सोनम देशमुख, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अंकुश झिटे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी व ओंझळ फाऊंडेशनच्या पद्मिनी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यापुर्वी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडील निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ या अभियानाअंतर्गत २० मे ते ५ जून या कालावधीमध्ये रिड्युस, रियुज, रिसायकल केंद्र स्थापन करून सदरची मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहीमेस शहरातील नागरिकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे यापुढेही नागरिकांसाठी अशी मोहीम कायमस्वरुपी होण्याच्या दृष्टीने अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रिड्युस, रियुज, रिसायकल केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

सदर मोहीम पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या निरोगी आयुष्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने या सकारात्मक मोहीमेमध्ये नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांनी केले.यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष हनुमंत गुबयाड यांनी सदर उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून रिड्युस, रियुज, रिसायकल केंद्र पालिकेने सुरू केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.